पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छंद

विषय : छंद एक आयुष्याची शैली मुक्तछंद हे गुढ असतात,तीच तुमची ओळख बनतात जसं 'स्वर-सम्राज्ञी', 'व्यंगचित्रकार', 'क्रिकेट चा देव' अश्या विविध विशेषणांची सांगड, त्या त्या छंदाशी निगडित असलेलं अतुट नातं पुढील नावाच्या व्यक्तीला ध्रुवताऱ्या सारख स्थान मायाजलात देऊन जातं, आवडीचे सातत्य म्हणजेच नादिष्ट धारिष्ट आसनं म्हणजेच 'छंद' अशी उकल मी करतो,  त्यात खवय्येगिरी आली, पण एकच प्याला देखील पुरेसा. मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी मधे असलेले साहित्य म्हणजेच मराठी भाषेतील छंद जोपासले गेले म्हणून हां ठेवा आपल्याला जोपासता आला यात दुमत नाही. छंद आपले भौतिक,सामाजिक,वैयक्तिक जीवन बदलून टाकतो, आणि यातून आलेली विचारांची शुद्धता मानवी जीवनात प्रगल्भतेचा ओढा राक्षसी वृत्ती ला डावळून एका सुंदर आयुष्याची शैली या नावाच्या त्रिजेच्या परिघात घेऊन येतो  वास्तविक पाहता छंदाला वय नसतं, हवी असते ती फक्त त्याची ओळख त्यात गुंफली की कलेची देवता त्याच्या निष्ठेवर प्रसन्न होतेच, आवड आसते पण तीच आवड उदरनिर्वाहाचे साधान म्हणून रुजू होते