छंद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विषय : छंद एक आयुष्याची शैली
मुक्तछंद हे गुढ असतात,तीच तुमची ओळख बनतात जसं 'स्वर-सम्राज्ञी', 'व्यंगचित्रकार', 'क्रिकेट चा देव' अश्या विविध विशेषणांची सांगड, त्या त्या छंदाशी निगडित असलेलं अतुट नातं पुढील नावाच्या व्यक्तीला ध्रुवताऱ्या सारख स्थान मायाजलात देऊन जातं,
आवडीचे सातत्य म्हणजेच नादिष्ट धारिष्ट आसनं म्हणजेच 'छंद' अशी उकल मी करतो,
त्यात खवय्येगिरी आली, पण एकच प्याला देखील पुरेसा.
मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी मधे असलेले साहित्य म्हणजेच मराठी भाषेतील छंद जोपासले गेले म्हणून हां ठेवा आपल्याला जोपासता आला यात दुमत नाही.
छंद आपले भौतिक,सामाजिक,वैयक्तिक जीवन बदलून टाकतो, आणि यातून आलेली विचारांची शुद्धता मानवी जीवनात प्रगल्भतेचा ओढा राक्षसी वृत्ती ला डावळून एका सुंदर आयुष्याची शैली या नावाच्या त्रिजेच्या परिघात घेऊन येतो
वास्तविक पाहता छंदाला वय नसतं, हवी असते ती फक्त त्याची ओळख त्यात गुंफली की कलेची देवता त्याच्या निष्ठेवर प्रसन्न होतेच, आवड आसते पण तीच आवड उदरनिर्वाहाचे साधान म्हणून रुजू होते तेव्हा मनुष्य स्थैर्य प्राप्त करतो
डिजिटल व्यासपीठ अधिक प्रभावशील आहे आपल्यातील उमेदिला मिळालेला वाव हा त्याबद्दल आपली रूची आधिक वाढवतो, जागतिक स्तरावर दर्जा मिळवलेल्या अश्या ३०८+ कलाप्रकार आज दिमाखात त्याचं विविधतेतली सांगड मानवी जीवनाची शैली म्हणून अभ्यासली जाते आहे,
वळूया छंदातील चोखंदळ रसिकते कडे, उत्तम छंदी हा उत्तम रसिक हवा, त्यातून आपल्या कलेला धार येते अस म्हणायला थोडक्यात हरकत नाही !
चुका काढण्यात पटाईत चार लोक खिश्यात घेऊन फिरण्याची मिजास जमायला हावी, ते आहात तर तुम्ही आहात, माझा छंद मला तुमच्यात समरस करतो आहे, ते ही कोणत्या नाव; ना ओळखी शिवाय, एखाद रेखाटन तुमच्याच कविता,चारोळीतुन मनात लुकलुकतं हीच प्रेमाची पावती
स्पर्धेचे युग अस सगळे म्हणतात,
पण छंद एकमेव गोष्ट आहे जिथे फक्त विनामोबदला निखळ समाधान पहायला मिळते, कोणत्याही वलयांची तोरण, मुक्तछंदास बांधून ठेउ शकत नाही ना तो कलाकार देखील.. कलेवर आपला हक्क सिद्ध करू शकत नाही,
सगळ्यांना सगळ येते हल्ली, हे प्रांजळ मत माझ्या गुरुंचे आहे,ज्ञान दिल्याने वाढते, एक सांगावेसे वाटते स्थळ: फर्गुसन कॉलेज रोड, पुणे कधी एक याचक(भिक्षू), उत्तम चित्रकारच चित्र/पोर्ट्रेट काढत बसलेला पाहिला असेल पोटाच्या खळगीसाठी चार पैकं; वैशालीमधून बाहेरपडलेली व्यक्ती नोट समोर टाकते, तो वर पाहतो नाही ना त्यांचे आभार मानतो,
एकदा रंग,कुंचले,पेन्सिल,कागद असं कलेच्या मित्रांच्या मदतीने साहित्य समोर ठेवले, त्या व्यक्तीचा आनंद शब्दात सांगता येत नाही!
आयुष्याच्या शैली चे पैलू, आर्टिस्ट ला वेडं ठरवून नक्की जातात मात्र, जबाबदारी च ओझ असलेली व्यक्ती मात्र सरळ मार्गी चालत राहते, हे वावगं ठरणार नाही !
छंद मनातलं माणूसपण टिकवतं, तसच् माणूसपण वाढवतं देखील, स्वत:ला शोधण्याची, व्यक्त करण्याची संधी देतं, जगण्यावरचं प्रेम करायला शिकवतं, मन देखील रमवतं,
जीवनाचा, निर्सगाचा, मनाचा शोध घ्यायला देखील शिकवतात आपले छंद, समाजोपयोगी काम करणं प्राणी,पक्षी,वृक्ष ते आपल्या अभिजात भाषेचा दर्जा भक्कम उभा करण्यासाठी नकळत हातभार हा छंद नक्की घेऊन येतो !
ती धुंद मिठी, बेबंद नशा श्वासांत सखे विरतात दिशा बेहोश सुखाच्या या गगनीं मी आज मला हरवून बसे!
तुझे रूप सखे गुलजार असे काहूर मनी उठले भलते दिनरात तुझा ग ध्यास जडे हा छंद जिवाला लावि पिसें!
या वंदनाताईच्या ओळी इथे आठवल्या नाही अस होणार नाही.
असा हा छंद एक आयुष्याची शैली होतो, नक्कीच हि आवड यानिमित्त का होईना जोपासायची ईच्छाची खोली आपल्या सर्वांच्या मनात रुजली जावी !
बोलावं तितकं अपुरं पडेल, अश्या उत्साहपूर्ण वातावरणाच्या अनुभूती ची सफर आपल्याला मानुस म्हणून नक्की उभे करते,
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा