'Candid' #Storyteller Nipun Dharmadhikari


     





   Nipun या नावाशी आपला उगाच कुठेतरी संबंध आहे अस वाटणे स्वाभाविक कारण आमचे पूर्वीचे Surname Dharmadhikari होते,    
        Nipun ची घरची Background पाहिली तर आई आणि वडील दोघे प्राध्यापक, इंग्रजी माध्यम Convent शाळेत असल्या मुळे  मराठी किंवा English नाटकांचे वातावरण शाळेत मुळीच नव्हतच, 
    सुरुवातीला नाटकचा प्रकार याला Boring च ना, आणि या वयात असताना TV नव्याने आला होता मग ते कार्टून नेटवर्क CN घरबसल्या पाहण्यात किंवा films पहायच्या अश्यात Intrest होता, मुळात आई वडिलांनी 'वह्राड निघाले लंडन ला' एकपात्री नाटक पहायला घेऊन गेले त्यात Nipun ची #कुरकुर सुरुवातीला असायची पण याला ते नाटक इतकं आवडलं की त्याची कैसेट घेतली आणि येता जाता ते ऐकता ऐकता कानावर पडून तोंडपाठ झालं,    
   मग कधी आपल्या वर्गा मधे तर कधी दुसऱ्या वर्गातील शिक्षक आले नसतील तर तिथे जाऊन टुमदार त्याचं सादरीकरण शाळेतील शिक्षका सोबत कधीतरी शाळेतील Annual Day ते सोसायटी गणपती मधे सादरीकरण इथून दाद ही Nipun ला मिळू लागली असं करत करत कुठेतरी storyteller चे बिज रोवले गेले अस म्हणायला हरकत नाही... 


    'कारल्याची भाजी खाऊन पाहिली जात नाही तोपर्यंत ती अजिबताच आवडत नसते' नाहीका, तसच हे छंद पण मनाच्या तळाशी घर करुण जातात हे ही तितकच खरं पण आपल्या काय केलेलं जास्त आवडते आहे कुठं मन रमतंय हे उमगत नाही तोवर ही अकलेच्या कांद्याला  आपल्याला काहीतरी येताय किवा यातल बऱ्यापैकी समजते आहे राव आपल्याला अस जेव्हा या कालावधी मधे वैचारिक पातळी नुसार आणि मिळालेले मार्गदर्शक यांच्या मधून बालपण दुतर्फा रहदारी मधून वाट काढत पुढे जात असत, 

   मुक्तछंद हे नेहमी गुढ आसतात आणि तिच तुमची खरी ओळख बनतात अश्याच व्यक्तीच्या मनाचा तळ जितका गाठायला जाउ तितकच तो किती रंजक आहे याची जाणीव आपल्याला झाल्या शिवाय राहत नाही, असो तर...

      Nipun च्या घरी तसं पहिल्यांदाच अतिथी, अर्थात आईनी मस्त हसून स्वागत केल मला वाटते बाबा काहीतरी lappy वर काम करत होते, आणि सरळ आतल्या देवघराच्या खोलीत गेल्या बरोबर वाचनाची आवड किती भरपूर आहे हे तिथे असलेल्या पुस्तकी ग्रंथालय बघुन लक्षात येते, आई वडील नुकतेच सेवानिवृत्त झाले असले तरी आजही घरात आभ्यसचे वातावरण नक्कीच आहे  हे आवर्जून Nipun सांगतो, जस की माझ्या सारख्या Artist च्या खोलीत कलेच्या वेगवेगळ्या माध्यमाची मांदियाळी असते तशीच शुभ्र सुदृढ Nipun च्या खोलीत पुस्तकांचा खजिना दिसणार कसा नाही पण, कमालीची गोष्ट नजरेतून सुटली नाही ती म्हणजे Dumbbell Weight Plates सुधा दिसले बरं, अत्ता Storytelling ची मेहनत आपल्याला दिसते आहेच पण या weights वर घेतलेली मेहनत देखील भविष्यात आपल्याला मात्र दिसू शकते;जसा दिसतो वेगवेगळ्या माध्यमा मधून अगदी तसच वागणं, बोलणं, दिसणं मिश्किलपणा आणि आवाज सुधा तसं पाहिले तर Sharad Kelkar चा पण कसा Unique आहे तसच काहीस् वेगळा गळ्या ची खूबी आहे, Nipun ने विचार केला तर Animated पात्र असतात त्यांना Voice Over साठी मला आवाज ऐकायला आवडेल नक्की अस माझ वैयक्तिक मत आहे,

            काही नाही मग, पुढे Storyteller च बोलू लागला ते अस.. 

          शाळेत असताना अगदीच science पेक्षा गणित फार आवडत होते, आणि निपुण चा थोरला भाऊ संगणक अभियंता अमेरिकेत 16 वर्ष स्थायिक, तर Nipun ला मनोमन डॉक्टर व्हाव अस वाटायचे पण आजारी व्यक्तीला पहायचे आणि त्यावर एखाद्या वैद्य डॉक्टर ची नक्कल कुतुहलाचा विषय तसच आठवी नववी मधे गेला तस समाजु लागले की उगीच Mark पडत आहेत म्हणून यात पुढे जाने शक्य नाही कारण फारशी अशी माहिती नव्हती Medical बद्दल, गणित आणि भाषा विषय आवडीचे होते, 

   
      science आणि commerce चे form भरताना Nipun ला अत्ता अस वताते की तेव्हा Art ला कसा काय form भरला गेला नाही, आई वडिलांना याच काय होणार काळजी होतीच
                                         झाल ते छान झाल पण CA गिरी Practically सुरु झाली तसं समजले यात आयुष्यभर हेच Accounts चा लेखाजोखा करता येईल अस वाटत नव्हतं, BMCC मधे असताना एक हॉल होता तिथे काही कारण नसताना पडिक आसन आणि तिथल्या ओळखी अर्थात Amey Wagh तर आहेच, पहिला Director Sarang Sathaye आणि फास्टर फेने, 2 Special, Kshitij Patwardhan त्यानेच बापजन्म ची गाणी लिहली आहेत सोबतच;  तो वेगळ्या कॉलेज मधे होता पण पुरुषोत्तम फिरोदिया मुळे ओळख झाली,
मुरांबा चा Varun Narvekar या सगळ्या सोबत ओळख होत गेली अस मागे वळून पाहताना आजच्या या सर्वांची तिथे ओळख झालेली अस Nipun च्या लक्षात येत होते, 
                       एक झाल की एक अश्या प्रश्नाचा ओघ अत्ता सुरु झाला होता, यामधे न चुकताच Candid व्यक्त होताना एकदम साधेपण, अजुनही Nipun कडे बघुन एखादी कविता 'तिने' केलेली असेल का खरच ? तर ते गुपीत त्यांच्या दोघात च असेल ब्वॉ, मी तरी तिथल्या मनातील खोली चा तळ माहित करुन घेयचा वगैरे अशी तयारी करुण आलेलो नक्कीच नव्हतो !
      त्यामुळे ती मुठ झाकुन खुर्चीवर मांडी घालून Nipun च बसने हे प्रत्येक वेळी मी Observe केले आहे आणि ती मुठ मांडीवर ठोकत,मधेच मिश्किल पण ऐकणार्याला समजलं नाही तर स्वताच 'गालतल्या गालात' वाढलेल्या दाढी मिशी आड कसा तो हसतो हे पाहायला मज्जा येते, Nipun ना वेगळाच आहे,
असो मला Crush होयचे त्याच्यावर... तर पुढे ऐका

       त्या हॉल मधे रात्र रात्र भर केलेल्या तालमी; 11वी ला Amey दुसऱ्या Division मधे होता, तेव्हा  'A play Within A Play' Sarang ने बसवलेले आणि या तिघाना उचलून नाचले प्रेक्षक अक्षरशा तो क्षण असो, करंडक मिळाला तो जल्लोष, आणि शेवटचा Chance म्हणून मस्त टीम जमली Amey, Alok Rajwade, Abhay Mahajan, Gandhar Sangoram अश्या वेगवेगळया सोबत केलेला प्रयोग असे पाच वर्षात 3 वेळा करंडक केल आणि शेवटी 8 अप्रैल 2008 ला passout झाल्यावर पुढे बघायचे आणि अंतर महाविद्यालय करंडक मधून बाहेर येऊन वाटचाल सुरु केली, 

              समन्वय चे Shashank Shende, पुण्यात Mohit Takalkar, kiran Yadnyopavit, sandesh Kulkarni, मुंबई मधे अविष्कार संस्थेचा Chetan Datar अशी तेव्हाची हात धरला अशी ती लोक त्याना याना Godfather म्हणाव अस नाही पन ती ओळखीचि असावीत असेही काही नाहिये ना,आज Akarsh khurana याच्या सोबत ही सध्या Nipun च इंगजी नाटक चालू आहे.

 'नाटक कंपनी' सुरु केलं, यामागे अस होते की कॉलेज चे बैनर गेल्यावर आपल्याला काही संस्था सोबत कामही केले पण पुढे मग शेवटी जसे जसे BMCC मधून Passout होत गेले तसे कलाकार या कंपनी शी जुळत गेले,


Mahesh Elkunchwar याचं 'वडा चिरेबंदी', 'मृगरंग' 'तळ्याकाठी' 'युगांत' Mahesh Aalekar यांचे 'महानिर्वाण' 'बेगम बर्वे'  ही काही भरपूर पैकी काही आवडती नाटके आहेत, Nipun ची,


         Purva Naresh चा फोन येणं ते  'Nautanki Sala' release होणे के फटकन झाल, आणि  'बापजन्म' या दोन मधे 4 वर्षा चा कालावधी लोटला, एकंदरीत पुढचा struggle हां कधी संपत नाही, पहिलं काम मिळवण्या साठी एक struggle असतो आणि कामाचे सातत्य ठेवणे हां देखील एक struggle असतो, VFX Animation चे बजेट खुप असतात त्यात तिन एक मराठी चित्रपट होतात त्यानुसार Survive करायला हावं...

     एकूणच काय तर कथा सांगायला आवडली की कथेच माध्यम कोणतेही असो ते त्यामधे करायला आवडते, Forbs 30 under 30 च्या पर्वा नंतर पुढे मोठी मजल घेण्या साठी शुभेछा !    
     
       Friendzone मधील Friendship आपलेपणाने जपनारा 
 असा हां  कराल ते मनापासून अस सांगणारा एक ....
   'Candid' Storyteller ! 


                                                    Vinit Vaidya
                                                    Animation Activist
                                                    Instagram Twitter

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Bitcoin म्हणजे काय ! What is Bitcoin ?

Google Search सम्मेलन 2018, पुणे